जगभरातील करोनाच्या बळींची संख्या 30 लाखांवर

रिओ डी जनेरिओ  – करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तब्बल 30 लाखांच्याही पुढे गेली आहे. जगभरात करोना विरोधी लसीकरणाला वेगाने सुरुवात झाली असली तरी या मृतांच्या आकडेवारीने लसीकरण मोहिमेला जोरदार हादरा बसला आहे. विशेषतः ब्राझिल, भारत आणि फ्रान्समध्ये मृतांची आकडेवारी लक्षणीय आहे. ही आकडेवारी 30 लाखांपेक्षाही अधिक असण्याची शक्‍यता आहे. कारण मोठ्या देशांमध्ये प्रारंभीच्या काळातल्या रुग्णांच्या संख्येची योग्यप्रकारे मोजणीच झालेली नव्हती. 

करोनाच्या रुग्णांची मोजणी 2019 च्या उत्तरार्धात चीनमधील वुहानमध्ये झाली. पण त्यापूर्वीही अनेक ठिकाणी साथ पसरायला सुरुवात झाली होती. जगभरात, विषाणूचा प्रसार आणि त्यास नियंत्रणात आणण्याची चढाओढ देश-देशात मोठ्या प्रमाणात बदलती होती. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या श्रीमंत देशांमध्ये लसीकरण वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर भारत आणि फ्रान्ससारख्या देशातही लसीकरण मोहिमेसाठी लस कमी पडायला लागली आहे. जगभरात दिवसाला 12 हजार रुग्णांचा मृत्यू होतो आहे. तर दिवसाला 7 लाख जणांना करोनाची लागण होतो आहे.

एकट्या अमेरिकेतील मृतांची संख्या 5 लाख 60 हजाराच्या वर गेली आहे. जगभरातील एकूण मृतांच्या आकडेवारीतील एक षष्ठांश रुग्णांचा मृत्यू अमेरिकेत झाला आहे. जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेतील मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ ब्राझिल, मेक्‍सिको, भारत आणि ब्रिटनचा क्रमांक लागतो.

करोना प्रतिबंधासाठी वापरल्या जाणाऱ्या जॉन्सन ऍन्ड जॉन्सनच्या लसीमुळे रक्‍तात गुठळ्या व्हायला लागल्याने या लसीचा वापर या महिन्यात अमेरिकेत आणि युरोपातील अन्य काही देशांमध्येही थांबवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ऍस्ट्राझेनकाच्या लसीलाही काही देशांमध्ये आक्षेप घेतल गेला आहे. त्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेचा वेग मंदावण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.