जगात आतापर्यंत करोना बळींची संख्या सहा लाखांच्याही पुढे

न्यूयॉर्क : जगात दररोज लाखांपेक्षा जास्त करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत एक कोटी ४४ लाख २५ हजार ८६५ करोनाबाधित रुग्ण झाले आहेत. तर करोना बळींची संख्या सहा लाख चार हजार ९१७ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ८६ लाख १२ हजार जणांनी करोनावर मात केली आहे. ५२ लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जगात अमेरिका, ब्राझील आणि भारताला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३८ लाख ३३ हजार २७१ जणांना करोना झाला आहे. यापैकी एक लाख ४२ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराची परिस्थिती सर्वात भयानक आहे. अमेरिकासारख्या देशात करोना विषाणूमुळे झालेल्या नुकासानामुळे अनेक देशात भितीचं वातावरण आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये दररोज ५० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.

ब्राझीलमध्येही करोनाची भयावह परिस्थिती असून आतापर्यंत २० लाख ७५ हजार जणांना करोना झाला आहे. तर ७८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलपाठोपाठ भारताला करोनाचा विळाखा बसला आहे. भारतामध्ये आतापर्यंत जवळपास ११ लाख जणांना करोना झाला असून २७ हजार जणांना करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २० दिवसांत भारतात पाच लाख करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या दरदिवशी ३० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.