‘या’ भारतीय कंपनीने बनविले जगातील सर्वात महागडे चॉकलेट; गिनीज बुकमध्ये नोंद 

मुंबई – अनेक क्षेत्रात कार्यरत असणारी आयटीसी कंपनीने जगातील सर्वात महागडे चॉकलेट लाँच केले आहे. या चॉकलेटची प्रती किलोग्रॅम किंमत जवळपास ४.३ लाख रुपये आहे. या चॉकलेटला आयटीसीने आपल्या फॅबल ब्रँड अंतर्गत लॉंच केले आहे. लॉंच होताच या चॉकलेटची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

आयटीसीचे हे चॉकलेट हाताने बनवलेल्या लाकडाच्या बॉक्समध्ये उपलब्ध असेल. यामध्ये १५ ग्रॅमची १५ ट्रफल्स असतील. या बॉक्सची किंमत सर्व करांसहित १ लाख रुपये असणार आहे.

याबाबत आयटीसीचे आन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज रुस्तगी यांनी म्हंटले कि, फॅबलमध्ये नवीन बेंचमार्क स्थापन केल्याने आम्ही आनंदी आहोत. आम्ही केवळ भारतीय बाजरातच नव्हेतर जागतिक स्तरावर हे चॉकलेट उपलब्ध केले आहे. तसेच या चॉकलेटचा समावेश गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, याआधी २०१२ साली डेन्मार्कच्या अर्टिसन फ्रिर्ट्जने ३.३९ रुपयांचे चॉकलेट बाजारात आणले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.