मुंबई – जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मिडीया ऍप्स असलेल्या फेसबुक नेहमीच आपल्या युजर्स डिमांडनुसार विविध नवे अपडेट उपलब्ध करत असतो. यातच फेसबुक लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर नवी सर्व्हिस सुरू करणार आहे.
वापरकर्त्यांना आता फेसबुकवर न्यूज मिळणार आहे. या न्यूज सेवेच्या माध्यमातून जगभरातील सर्व बातम्या या फेसबुक वापरकर्त्यांना पाहायला मिळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकमध्ये लवकरच एक न्यूज टॅबचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमांना दिली होती.
न्यूज टॅबद्वारे ही मिळणार सेवा
– युजर्सना आता फेसबुकवर नवा न्यूज सेक्शन मिळणार आहे.
– न्यूज सेक्शनच्या माध्यमातून जगभरातील सर्व बातम्या या युजर्सना पाहायला मिळणार आहेत.
– न्यूज सेक्शन या नव्या सर्व्हिससाठी फेसबुक न्यूज प्रोव्हाईड करणाऱ्या वेबसाईट आणि एजन्सीसोबत चर्चा करत आहे. या एजन्सीमार्फत फेसबुक अचूक बातमी यूजर्सला उपलब्ध करून देणार आहे.
– या न्यूज टॅबद्वारे फेक न्युजला आळा बसणार आहे.