पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आव्हानांला प्रतिसाद देत पुणेकरांनी 100%जनता कर्फ्यूला साथ दिली. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या महानगरपालिका आरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी,आपत्ती व्यवस्थापन ,सुरक्षा विभाग अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेबद्दल कृतघ्न्यता व्यक्त करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ हे आज नायडू हॉस्पिटला जाऊन आरोग्य सेवकांना गुलाबाचे फुल देऊन, टाळ्या वाजवून आभार मानले व सर्वाना धन्यवाद दिले.