पुणे – शहरातील वीकेंड लॉकडाऊन शनिवारपासून रद्द केला. त्यामुळे मार्केटयार्डही सुरू होणार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दर रविवारी बंद राहणार मार्केटयार्डातील तरकारी, फुले, फळे, कांदा-बटाटा, पान व केळी विभाग रविवारपासून साप्ताहिक सुट्टी वगळून सुरू राहणार आहे.
याखेरीज, उपबाजारही सुरू राहणार आहेत. करोना नियमावलीचे पालन करत व्यवहार पार पाडावे, असे आवाहन मधुकांत गरड यांनी केले आहे.