अभिनेत्री अन्या सिंहने “नेव्हर किस योर बेस्ट फ्रेंड’ या वेब सिरीजमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली आहे. तिचे म्हणणे आहे की, या शोच्या “लॉकडाउन स्पेशल’ भागातील चित्रीकरणाने मला अशा गोष्टी शिकवल्या ज्या कदाचित मी लक्षपूर्वक केल्या नसत्या.
एका मुलाखतीत अन्या म्हणाली, व्हर्च्युअल शूटिंगचा अनुभव खूपच रोमांचक होता. या काळात आम्ही अधिक स्वावलंबी होण्यास शिकलो आणि स्वत: हून बऱ्याच गोष्टी करायला लागलो. उदाहरणार्थ अभिनेता म्हणून आम्ही तयार होतो, आपले सीन आणि संवाद लक्षात ठेवतो आणि कॅमेऱ्यासमोर उभा राहतो. पण “लॉकडाउन स्पेशल’ भागातील फ्रेममध्ये काय-काय आहे, हे आम्हाला पाहावे लागत होते. या नियमित शूटिंगमध्ये आर्ट डायरेक्टर, छायाचित्रकार आणि इतर तज्ज्ञ या गोष्टींची काळजी घेत.
दरम्यान, “लॉकडाउन स्पेशल’मध्ये 10 मालिका असून त्या 18 जून रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. अन्याने सांगितले की, लॉकडाउन ऍपिसोड दुसरा भाग नाही. या छोट्या “लॉकडाउन स्पेशल’ मालिकेद्वारे आम्ही आमच्या प्रेक्षकांशी पुन्हा जोडत आहोत, असे तिने सांगितले.