रियाध – जगातील आतापर्यंतची सर्वात उंच इमारत “बुर्ज खलिफा’ मध्य पूर्वेमध्ये दुबईमध्ये आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र आता ही इमारत जगातील सर्वात उंच इमारत राहणार नाही. कारण आता सौदी अरेबियाने यापेक्षाही उंच इमारत बांधण्याचे ठरवले आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंम्मद अल्वालिद बिन तलाल यांनी जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याची घोषणा केली आहे. जेद्दाह जवळ या इमारतीचे बांधकाम सुरू असून ही केवळ अंशतःच पूर्ण झाली आहे.
तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सौदी अरेबियातील वित्त पुरवठादारांकडून निओमच्या उभारणीत गुंतवणूक केली जाण्याची शक्यता आहे. निओमचे मालक आणि सार्वजनिक गुंतवणूक निधीचे अध्यक्ष युवराज मोहम्मद हे आहेत. तेच या इमारतीचे एक लाभार्थी असू शकतील.
यापूर्वी अशाच मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचे गुंतवणूकदारांचे प्रयत्न अपयशी ठरले होते.
निओम या मोठ्या इमारतीच्या षक्यतेबाबतही संदिग्धता व्यक्त करण्यात येऊ लागली होती. तरिही निओम या इमारतीसाठी निधी संकलन ही आता तरी काही मोठी अडचण नाही. अनेक गुंतवणूकदारांना या मोठ्या प्रकल्पामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात निओम या जगातील सर्वात मोठ्या इमारतीचे स्वप्न साकार होताना दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.