कुआला लांपूर, (मलेशिया) – मलेशियाने चिकनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत बाजारपेठेवर येणारा ताण कमी करण्यासाठी मलेशिया सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मलेशियातील चिकन निर्यात बंदीचा फटका शेजारील सिंगापूला मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे. मलेशियातून पोल्ट्री उत्पादने निर्यात केल्या जाणाऱ्या प्रमुख तीन देशांमध्ये सिंगापूरचा समावेश आहे. मलेशियात चिकन निर्यातबंदी जाहीर झाल्याचे वृत्त समजताच सिंगापूरमधील समीश प्रेमींनी सुपर मार्केटमधून चिकन खरेदी करून ठेवायला सुरुवात केली.
मलेशियातून दर महिन्याला 3.6 दशलक्ष चिकनची निर्यात केली जाते. त्यापैकी बहुसंख्य चिकन सिंगापूरला जाते. मलेशियातील चिकन निर्यात बंदीचा परिणाम म्हणून सिंगापूरमधील चिकनचे दर 30 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता चिकनच्या ऐवजी पोर्क आणि सागरी खाद्यपदार्थ खवय्यांना देण्याची तयारी मलेशियातील बड्या हॉटेलांनी सुरू केली आहे.
रशिया आणि युक्रेनदरम्यानच्या युद्धाचा परिणाम म्हणून इंधन दरवाढ होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जगभरातील अनेक देशांमधील अन्नधान्याचे दर वाढत असून मलेशियातही चिकनच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. भारतानेही साखर आणि गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. इंडोनेशियानेही पाम तेलाच्या निर्यातीवर काही काळासाठी निर्यात घातली होती.