श्रीगोंदा – तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील रेणुका माता यात्रोत्सवानिमित्त माजी आ. राहुल जगताप यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत 485 बैलगाडे सहभागी झाले. पहिल्या दिवशी घाटाचा राजा म्हणून भिवाजी किसन गडदरे 11.36 सेकंद (तरडोबाचीवाडी), तर दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा म्हणून पांडुरंग किसन काळे 11.16 सेकंद (गव्हाणेवाडी, ता. श्रीगोंदा) यांनी मान मिळविला.
काल (रविवार) दुसऱ्या दिवशी अंतिम स्पर्धा पार पडली. बक्षीस वितरण माजी आ. राहुल जगताप, सूर्यजित पवार, प्रमोद जगताप, नारायण जगताप, सुभाष काळाणे, नितीन पाचपुते, बैलगाडा अभ्यासक संदीप बोधगे, संदीप सोनलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिल्या दिवशीचे विजेते बाळासाहेब जगताप (वाघोली, 11.43 सेकंद), पांडुरंग काळे (गव्हाणेवाडी 11.73), तुळजाई मित्र मंडळ (निघोज, 11.81). दुसऱ्या दिवशीचे विजेते पांडुरंग काळे (गव्हाणेवाडी, 11.81), आनंदा मदगे (पारनेर, 12.10), सागर गायकवाड (तळेगाव ढमढरे, 13.73).
या बैलगाडा शर्यतीस प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पंच म्हणून संतोष घोडे, निशांत बोदगे, तर समालोचक म्हणून माऊली मुळे, अण्णा जाधव यांनी काम पाहिले.