मुंबई – काही दिवसांपूर्वी ‘द काश्मीर फाईल्स’. हा हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. देशभरातून या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय पटलावर नेत्यांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला. समाजमाध्यमांवर अनेक मते नोंदविण्यात आली. अनेकांना चित्रपटाच्या तिकिटासाठी झगडावे लागले.
एवढे सगळं होऊन कोणालाही हा चित्रपट पाहण्याची इच्छा होईल. त्यामुळेच विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटानं प्रदर्शनानंतर लगेचच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण, एक प्रेक्षकवर्ग असाही होता ज्याला काही कारणास्तव हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहता आला नाही. पण, निराश होण्याचं कारण नाही.अखेर प्रतीक्षा संपली आहे. कारण, आता घरच्या घरी बसूनच या चित्रपटाचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे.
खुद्द विवेक अग्निहोत्रीनंच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली. 13 मे रोजी ‘द कश्मीर फाइल्स’ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं त्यानं सांगितलं. Zee5 वर हा चित्रपट आता तुम्हाआम्हा सर्वांना पाहता येणार आहे. क
काय आहे ‘द काश्मीर फाईल्स’.
विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ सध्या चर्चेत आहे. काँग्रेसच्या काळात काश्मीर खोऱ्यातील लोकांवर काय अत्याचार झाले हे समजण्यासाठी कश्मीर फाइल्स पाहा, असे वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी केल्यानंतर पुन्हा एकदा या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे.