शिरूरमध्ये पुरस्काराने शिक्षक सन्मानित
सविंदणे/ शिक्रापूर : शिक्षक हे जिवंत घटकांबरोबर काम करीत असून मुलांच्या निरागस व उदंड प्रेमाचे ते साक्षीदार आहेत. शाळेतील कामकाज करताना मुलांच्या जीवनावर कायम स्वरूपी परिणाम दिसून येईल. काम करुन मुलांच्या चेहऱ्यावर आणलेले आनंद हेच शिक्षकांचा खरा पुरस्कार आहे, असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी केले.
शिरुर येथे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राजीव फराटे हे होते. यावेळी शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र जासूद, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, दौंड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, सेकंडरी स्कूल एम्पोईज सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके, कार्याध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे, सचिव मारुती कदम, उपाध्यक्ष प्राचार्य अनिल शिंदे, प्राचार्य तुकाराम शिरसाट, विलास घोडे, रामनाथ इथापे, बाळासाहेब चव्हाण, सेकंडरी स्कूल एम्पोईज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे तज्ञ संचालक गुलाबराव गवळे, माध्यमिक संघाचे सोमनाथराव भंडारे, प्राचार्य अनिल साकोरे, प्राचार्य अशोक सरोदे, संजीव मांढरे, पुणे जिल्हा भूगोल परिषदेच्या उपाध्यक्ष रत्नप्रभा देशमुख उपस्थित होते.
यावेळी पाबळ येथील पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या कार्यकुशल शिक्षिका जिजाबाई जितेंद्रकुमार थिटे यांसह आदी शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षणाधिकारी वाखारे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संतोष खताळ यांनी केले. शिरूर मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य मारूती कदम यांनी आभार मानले.