नगर – स्टेशन रोड रस्त्यावरील लोखंडी पुला शेजारी बांधण्यात आलेला नवीन लोखंडी पुल नवीन वर्षाच्या सुरुवातीला चालू होणार अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे व नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी दिली. आज दिनांक 26 रोजी महापौर वाकळे व नगरसेविका जाधव यांनी या उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी जाधव व नगरसेवक प्रंशात गायकवाड व दत्ता जाधव यांनी या पुलावरील बांधण्यात आलेला फुटपाथ हा काढून घेण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच जुना लोखंडी पुल येथील रस्ता हा फुटपाथ साठी व छोट्या वाहनांसाठी वापरण्यात येईल.
मोठ्या वाहनांसाठी हा नवीन पूल वापरण्यात येणार असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले. नवीन पुलावर बांधण्यात आलेला फुटपाथ काढून घेण्याच्या सूचना संदर्भात महापौर यांच्याशी चर्चा केली असता ठेकेदाराला सांगून पुलावरील फुटपाथ लवकर काढण्यात येतील. त्यानंतर या पुलावरील काम करण्यात येईल असे महापौर वाकळे यांनी सांगितले. जानेवारीमध्ये हा रस्ता मोठ्या वाहनांसाठी खुला होणार आहे. यामुळे रेल्वेस्टेशन कडे जाण्यासाठी नागरिकांना कायनटिक चौकातून जाण्याचा त्रास वाचणार आहे . हा नवीन पुल नागरिकांसाठी लवकरात लवकर खुला होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. सदर रस्ता सुरु झाल्यानंतर वाहतुक कमी होणार आहे . शालेय विद्यार्थाना यांचा फायदा होणार असल्याचे प्रंशात गायकवाड यांनी सांगीतले.