कल्याण – कल्याण-डोंबिवलीत आज करोनाचे सर्वाधिक 18 नवीन रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या 213 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 68 रुग्ण बरे झाले आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याण-पश्चिम मधील 3, कल्याण पूर्व मध्ये3, डोंबिवली पूर्व मध्ये 5, डोंबिवली पश्चिम मध्ये 2, टिटवाळा येथे 5 रुग्ण आढळले आहेत.
कल्याण- डोंबिवलीत दिवसेंदिवस करोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. महापालिकेने 10 हॉटस्पॉट जाहीर केले आहेत. तर 122 पैकी 20 प्रभाग संवेदनशील म्हणून जाहीर केले आहेत.