शासनाच्या वैद्यकीय सहायता योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे – चंद्रकांत पाटील

बारामती : शासनाच्या वैद्यकीय सहाय्यता योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाने प्रयत्न करावेत,असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

बारामती येथील हॉस्पिटलला आज पालकमंत्री पाटील यांनी भेट दिली. रुग्णालयाच्या विविध कक्षांची त्यांनी पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार विजय पाटील, बारामती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.दिलीप लोंढे, उपाध्यक्ष डॉ.जे.जे.शहा, संचालक डॉ.संजय पुरंदरे,संचालक डॉ.गोकुळ काळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना वेळीच आवश्यक ते उपचार मिळाले पाहिजेत. सर्वसामान्य रुग्णांना उपचारासोबतच शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी आदी योजनांची माहिती रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून देणे गरजेचे आहे. सर्वसामान्य रुग्णांपर्यंत मदत पोहोचण्याकरीता प्रयत्न करावेत. या मदतीमुळे सर्वसामान्य कुटुंबावरील उपचाराचा आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल.

यावेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी घेतला. तसेच शासनाच्या विविध वैद्यकीय योजना व सुविधांचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना देण्याकरीता विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.