पुणे – नऱ्हे येथील नवले पूल परिसरातील सेल्फी पॉइंट येथे गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. हा आठवड्यात झालेल्या चौथा अपघात आहे.
साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. दरम्यान, कंटेनर महामार्गावरून खाली सेवा रस्त्यावर येऊन रॉयल रेस्टो बारच्या पायऱ्यांना धडकला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, कंटेनरचालक जखमी झाला आहे. पहिल्या झालेल्या अपघातात तीघांचा मृत्यू झाला.
तर दुसऱ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. तिसऱ्या आणि आज झालेल्या चौथ्या अपघातामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.