माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
मंचर – पुणे-नाशिक रस्त्यावरील मंचर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या कारंजाचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली.
मंचर येथील गेटवेल हॉस्पिटल समोर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे यांच्या पुढाकाराने 14 वा वित्त आयोग आणि ग्रामनिधीतून सुमारे 17 लाख रुपये खर्च करून कांरजे बसविण्यात आले. रात्रीच्या वेळी “मंचर माझा गाव, माझा अभिमान’ या नावाच्या कलर लाईटिंगमध्ये झगमगाट होणारे पाण्याचे कारंजे पुणे-नाशिक हमरस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.
कांरजे उद्घाटनप्रसंगी सरपंच दत्ता गांजाळे, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष राजू इनामदार, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले, उपसरपंच धनेश मोरडे यांसह ग्रामपंचायतीचे सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.