नवी दिल्ली – पंजान नॅशनल बॅंकेला दोन अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या रकमेला फसवून फरार झालेल्या निरव मोदी याची पत्नी अमी हिच्या विरोधात इंटरपोलने अटक वॉरंट जारी केले आहे.
निरव मोदीच्या पत्नीवर इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस या बाबत अंमलबजावणी संचनालयाने रेड नोटीस जारी करण्याची विनंती केली होती.
ही नोटीस जारी केल्यानंतर इंटरपोलचे सदस्य असणाऱ्या 192 देशांत आरोपीला पाहताच अटक केली जाते किंवा नजरकैदेत ठेवण्यात येते. त्यानंतर हस्तांतरण प्रक्रिया सुरू होते. 2018 मध्ये हा बॅंक घोटाळा उघड झाल्यापासून अमी मोदी देशातून फरार झाली होती.
इडीने हिरे व्यापारी निरव मोदी, त्याचा मामा मेहूल चोक्सी यांच्यासह अमी मोदीवरही मनी लॉंड्रींग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अलिकडेच निरव मोदीचा लहान भाऊ नेहल आणि नहीन पूर्वी यांच्यावरही इंटरपोलने नोटीस बजावली आहे.