जुन्नर – जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ मारुती पवार यांचे करोनामुळे शनिवारी (दि. 8) निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.
दशरथ पवार यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्याची करोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांना रक्तदाब, मधूमेह आदी आजार होते.
पारुंडे हे त्यांचे मूळ गाव. येथे भरणाऱ्या नाथपंथी साधूंच्या कुंभमेळा समितीचे ते अध्यक्ष होते. दशरथ पवार हे माजी आमदार वल्लभ बनके यांचे खंदे समर्थक होते.