सोरतापवाडी -करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या पूर्व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना शनिवारी (दि. 16) अवकाळीने तडाखा देऊन पुन्हा एकदा नुकसानीच्या खाईत लोटले आहे.
उरुळीकाचंन, सोरतापवाडी, नायगाव पेठ, कोरेगाव मुळ, वळती, शिंदवणे, टिळेकरवाडीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान केले आहे. टोमॅटोचे फड संपूर्ण जमिनीवर पडले तर भाजीपाला सडून जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पीक असलेले ऊस पीकही भइसपाट झाले आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली आहेत.
तर पॉलिहाऊसचे कागद फाटले आहे. विजेचे खांब अनेक ठिकाणी पडल्याने परिसरात अंधार पसरला आहे. तर पाऊस थांबल्यानंतर महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते.