मुंबई – आज बहीण-भावाचं नातं आणखी दृढ करणारा राखीपौर्णिमेचा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’ आहे. भारतात बहुतेक सर्वत्र राखीपौर्णिमा किंवा रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. हिंदू, जैन आणि काही शिख धर्मियही हा सण आनंदाने साजरा करतात.
आपल्या कलाक्षेत्रात सुद्धा हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यामुळे आजवर अनेक चित्रपटांमध्ये आपण होळी, दिवाळी किंवा रक्षाबंधन अशा सण-उत्सवांवर आधारित गाणी पाहिली आहेत. आज रक्षाबंधन असल्यामुळे बहीण-भावाच्या नात्यावर भाष्य करणारी बॉलिवूडमधीलकाही सदाबहार गाण्यांच्या आस्वाद घेऊया…
1971 मध्ये आलेला ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातलं ‘फुलों का तारों का सबका कहना है..’ हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. दिग्ज अभिनेते देव आनंद आणि झीनत अमान यांच्यावर हे गाणं चित्रीत केले होते.
‘बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है…’ हे गाणं धर्मेंद्र यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. 1974 साली आलेल्या रेशम की डोर या चित्रपटातील हे गाणं आहे.
1971 मध्ये आलेल्या ‘छोटी बहन’ या चित्रपटातील ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’ हे गाणे रक्षाबंधन सणावरच चित्रीत करण्यात आले. अभिनेते बलराज साहनी आणि नंदा यांच्यावर हे गाणे चित्रीत झालेले आहे.