पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. यंदा अध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत होणार आहे. ऍड. पांडुरंग थोरवे आणि ऍड. हेमंत झंजाड यांच्यात ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी शिवाजीनगर न्यायालयातील अशोका हॉल आणि नवीन बिल्डींगच्या बार रुममध्ये 18 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी रात्री मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
उपाध्यक्ष पदाच्या 2 जागांसाठी तब्बल सहा जण नशिब अजमावत आहेत. त्यामध्ये ऍड. विवेक भरगुडे, ऍड. चंद्रशेखर भुजबळ, ऍड. जयश्री चौधरी-बिडकर, ऍड. अमेय देशपांडे, ऍड. लक्ष्मणराव येळे पाटील, ऍड. कृष्णाजी झेंडे यांचा समावेश आहे. तर सचिव पदांच्या दोन जागांसाठीची लढत ऍड. सुरेखा भोसले, ऍड. शितल भुतडा, ऍड. पीयुष राठी आणि ऍड. अमोल शितोळे या चार उमेदवारांमध्ये होणार आहे. खजिनदार पदी ऍड. प्रथमेश भोईटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ऑडीटर पदासाठी ऍड. अजय देवकर, ऍड. शिल्पा कदम-बिराजदार, ऍड. सतिश शिंगाडे निवडणूक रिंगणात आहेत.
दहा कार्यकारिणी सदस्यांची सर्वानुमते निवड झाली आहे. त्यामध्ये ऍड. कुणाल आहिर, ऍड. अमोल भोरडे, ऍड. तेजस दंडगव्हाळ, ऍड. सई देशमुख, ऍड. अमोल दुरकर, ऍड. अर्चिता जोशी, ऍड. काजल कवडे, ऍड. मजहर मुजावर, ऍड. अजय नवले आणि ऍड. रितेश पाटील यांची सर्वानुमते निवड झाली आहे. या निवडणूकीसाठी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. अशोक संकपाळ काम पाहत आहेत. अतिरिक्त निवडणूक अधिकारी म्हणून ऍड. अजय पटवर्धन, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ऍड. फक्कडराव साकोरे, ऍड. मंगेश लेंडघर, ऍड. नमिता पाटील, ऍड. पूनम स्वामी, ऍड. पूजा भोसले काम पाहत आहेत. अंतिम यादी जाहीर करताना पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतिश मुळीक, उपाध्यक्ष ऍड. सचिन हिंगणेकर आणि सचिव ऍड. विकास बाबर उपस्थित होते.