कराड – वीज कनेक्शन जोडू नका नाहीतर तुम्हाला जिवंत ठेवत नाही असे म्हणून एकाने डॉक्टर महिलेवर कोयत्याने वार केले. येथील बुधवार पेठेतील शिवाजी क्लॉथ मार्केट समोर ही घटना गुरूवारी सकाळी बारा वाजणेच्या सुमारास घडली.
याबाबतची फिर्याद स्नेहल अनिल त्रिबंके (वय 55 रा. अर्थव रूक्मिणी ईस्टेटि, शिवाजी हौसिंग सोसायटी पाठीमागे बुधवार पेठ, कराड) यांनी शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी शिवाजी रघुनाथ सूर्यवंशी (रा. यशवंत बिल्डींग, बुधवार पेठ, कराड) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.