जेट एअरवेजचे गोयल गोत्यात येण्याची शक्यता; ईडी कडे महत्वाचे दस्तावेज

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी जेट एअरवेजचे नरेश गोयल यांच्या घरावर छापे टाकले होत. त्यानंतर आता ईडी ने असा दावा केला आहे की गोयल यांनी मोठ्या प्रमाणावर विदेशात पैसे पाठवले असून कर चुकवण्या साठी त्यांनी अनेक वेगवेगळ्या मार्गांचा विलंब केला आहे. एडी कडून करण्यात आलेला हा दावा गोयल यांचा अडचणीत भर घालणारा आहे.

दरम्यान गोयल यांच्या मुंबई आणि दिल्लीतील निवास्थानी छापे टाकण्यात आले होते. याचौकशीत महत्वाची दस्तावेज ईडी च्या हाती आले आहेत. या दस्तावेजात अनेकी तपशील हे संशयास्पद असून त्याबरोबरच अनेक डिजिटल स्वरूपातील पुरावेही हस्तगत करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गोयल यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून कर चुकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केल्याचे मिळालेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी दिसत आहे. पैसा विदेशात पाठवण्यासाठी झालेले व्यवहार हे संशयास्पद आहेत. असेही ईडीने सांगितले आहे. जेट समूहाच्याच दुबईतील एका कंपनीला कमिशनच्या स्वरूपात मोठी रक्कम पाठवण्यात आली आहे. यावरही इडी कडून बोट ठेवण्यात आले आहे.

गोयल यांच्या काही खात्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झालेली आहे. हा व्यवहार ‘फेमा’तील विविध तरतुदींचे उल्लंघन करणारा आहे.त्यामुळे परदेशात बेनामी संपत्ती असल्याच्या आरोपावरून ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा गोयल यांच्याविरुद्ध दाखल केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×