धनगर समाजाचा बारामातीत ठिय्या

29 ऑगस्टला नागपूर येथे आंदोलनाचा इशारा

बारामती- धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी बारामती तहसील कार्यालय समोर धनगर समाजाच्या वतीने मंगळवारी (दि. 13) ठिया आंदोलन करण्यात आले. 15 दिवसांत आरक्षण लागू करावे, अन्यथा गुरुवारी (दि. 29) नागपूर येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाजाच्या क्रांतीशौर्य सेनेच्या अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांनी दिला. त्याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले.

राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून बारामतीसह विविध जिल्ह्यात धनगर आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी विविध तालुक्‍यातील तहसील कार्यालयासमोर धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी ठिया मांडला. गेल्या 70 वर्षांपासून धनगर आरक्षणाचे घोंगड भिजत पडले आहे. राज्य सरकारला आरक्षणाचा प्रश्‍न सोडवता आलेले नाही.

आघाडी सरकारच्या काळातही फक्‍त मतांच्या भांडवलासाठी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न उठवला गेला;परंतु प्रत्यक्षात उत्तर मिळवता आले नाही. धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू करू असे आश्‍वासन देऊन एक हजार कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा करून समाजाची बोळवण करण्यात आले असल्याचा आरोप वाघमोडे यांनी यावेळी केला. दरम्यान, प्रांताधिकाऱ्यांच्या वतीने नायब तहसीलदार भक्‍ती देवकाते, निवासी नायब तहसीलदार धनंजय जाधव यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी गणपत देवकाते, गणेश लकडे, सुनील भगत, सनी देवकाते, दिलीप नाळे, योगेश नालंदे, सुजित वाघमोडे, मंदाकिनी घुले, सुनीता पिंगळे, ज्योती सरक, पोपट घुले, सुहास टकले, प्रभाकर ठवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here