शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल

मुंबई : राज्यातील शाळा उद्यापासून सुरू होत आहे. करोना वाढण्याच्या भीतीने काही शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय तिथल्या स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, यावरून संभ्रम निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मुद्यावर बच्चू कडू  यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे की,’शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल.’

दरम्यान,  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माहिती देत “शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच सक्ती नसेल, विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात,” असं स्पष्ट केले आहे.

राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्यापासून शाळा सुरू होत असून, शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आलेले आहेत. यासंदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी याविषयी सविस्तर माहिती दिली. “सरकारने जबाबदारी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एखाद्या ठिकाणी जास्त उद्रेक झाला, तर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्यास सांगितलेले आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या सचिवांशी माझी चर्चा झाली आहे. मुलांना शाळेत पाठवणे सक्तीचे नसून, ऑनलाईन शिक्षण चालू राहिल,” अशी माहिती तनपुरे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.