सुष्मिता सेनच्या मुलीचे ऍक्‍टिंगमध्ये पदार्पण

मुले आपल्या माता-पित्यांचे अनुकरण करतच मार्गक्रमण करत असतात. सुष्मिता सेनची कन्या रिनी हिने देखील आपल्या आईच्याच पावलावर पाऊल टाकून ऍक्‍टिंगमध्ये पदार्पण केले आहे. गुरुवारी सुष्मिता सेनच्या 45 व्या वाढदिवसाच्याच निमित्ताने रिनेने आपल्या पहिल्या शॉर्ट फिल्मचे ट्रेलर रिलीज केले. 

हे तिने आपल्या आईला दिलेले बर्थ डे गिफ्ट होते. आपणही ऍक्‍टिंग करावी असे रिनीला वाटले आणि तिने आपली ही ईच्छा आईसमोर ठेवल्यावर सुष्मिताने तिच्यासमोर दोन वेगवेगळ्या अटी ठेवल्या. त्यातील पहिली अट म्हणजे स्वतःचे शिक्षण पूर्ण करणे आणि दुसरी अट म्हणजे जे काही करायचे ते स्वतःच्या बळावरच करायचे. या दोन्ही अटी रिनीने स्वीकारल्या आणि आपले मार्गक्रमण सुरू केले.

आपली आई सिंगल मदर आहे. ती एक चांगली ऍक्‍टरदेखील आहे, याची रिनीला लहानपणापासून्‌ कल्पना आहे. सुष्मिताच्या बरोबर ती अनेक वेळेला सेटवर जात असायची. अगदी 6 महिन्यांची असल्यापासून ती सुष्मिताला ऍक्‍टिंग करताना बघत असायची. तेंव्हापासून आपल्याला कलाकारच बनायचे आहे, हे तिने ठरवून टाकले होते. “सट्टाबाजी’ या सिनेमातून तिने ऍक्‍टिंगमध्ये पदार्पण केले असल्याचेही समजते आहे. 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.