पुणे : निगडीत वैमनस्यातून एकाचा खून करून पसार झालेल्या सराइताला डेक्कन पोलिसांनी नदीपात्रातील रस्त्यावर पकडले. अक्षय प्रकाश माने (वय २४, रा. पर्वती दर्शन, पुणे-सातारा रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
माने आणि साथीदारांनी गेल्या महिन्यात निगडी भागात वैमनस्यातून शक्तीमान प्रकाश कांबळे याचा खून केला होता. खून प्रकरणात गेले एक महिना तो पसार होता.
पसार झालेला माने याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. तो रात्री डेक्कन नदीपात्रातीतल रस्त्यावर थांबल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली.
मानेला पोलिसांनी सापळा लावून पकडले. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहाय्यक आयुक्त मालोजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, उपनिरीक्षक किशोर शिंदे, हवालदार गद्रे, चव्हाण, शिंगाडे, डामसे, वाघमारे, रायकर, कोटकर आदींनी ही कारवाई केली.