नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचे फोन कॉल केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जयेश पुजारी याचे सध्या कर्नाटकच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला अफसर पाशा याच्याशी संबंध असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले आहे.
अफसर पाशा हा बंगळुरू येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आहे. पुजारीने 14 जानेवारी रोजी गडकरींच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात फोन करून 100 कोटी रुपयांची मागणी केली आणि आपण दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असल्याचा दावा केला होता.
पुजारीला बेळगावी तुरुंगातून 28 मार्च रोजी अटक करून नागपुरात आणण्यात आले आणि त्याच्यावर कठोर कलमे लागू केली होती. त्याची चौकशी करताना पुजारीचे अफसर पाशा या दहशतवाद्याशी संबंध असल्याचे आढळून आले आहे.