कात्रज – कात्रज जुना बोगदा मध्ये दुपारी पावणे चारच्या सुमारास खाजगी मोटार गाडीने पेट घेतला सुदैवाने मोटारीतील असलेले चौघीजणी ताबडतोब बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली कात्रज अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत अर्ध्या तासात आग विझवली.मूळ कराडचे राहणारे नितीन जिजाबा नलावडे हे आपल्या पत्नी सह कोंढव्यात एका नामांकित शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या आपल्या मुलींना सुटी निमित्त घेऊन गावी निघाले होते.
दुपारी पावणे चारच्या दरम्यान कात्रज घाट चढून गेल्यानंतर बोगद्यामध्ये शिरत असताना गाडीच्या इंजिन मध्ये कसला तरी आवाज झाला. आणि त्यानंतर थोडा थोडा धूर येण्यास सुरुवात झाल्याने गाडी चालक यांनी गाडी बाजूला घेऊन, गाडीतील सर्व चौघेजण खाली उतरून सुरक्षित स्थळी उभे राहिले. गाडीच्या इंजिनचा दरवाजा खोलेपर्यंत गाडीच्या इंजिन ने पेट घेतला होता.
सुदैवाने सर्वजण खाली उतरल्याने मोठी दुर्घटना टळली अशी माहिती गाडी चालक नितीन नलावडे यांनी दिली.
गाडी पेट्रोल व एलपीजी गॅस वर चालत असल्याने ज्यावेळी गाडीने पेट घेतला. त्यावेळेस गाडी एलपीजी म्हणजेच गॅस वर चालू होती. कात्रज अग्निशामक दलातील दोन गाड्या दहा मिनिटांमध्ये बोगद्याजवळ घेऊन विस मिनिटांमध्ये संपूर्ण गाडीची आग विझवण्यात आली. तांडेल रामदास शिंदे, वाहन चालक गणपत भंडारे, फायरमन महादेव मांगडे, व पंकज इंगवले, आदी कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.