वाघोली – वेस्ट बंगाल (कलकत्ता) येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धामध्ये वाघोली येथील अकरा मुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये नऊ मुलांनी प्रथम तर दोन मुलांनी द्वितीय क्रमांक पटकावून बाजी मारली आहे.
वेस्ट बंगाल येथे १२ ऑगष्ट रोजी खुल्या कराटे स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये इंडिया, श्रीलंका, नेपाल, पाकिस्तान, ऑस्टोलिया, जपान या देशांनी सहभाग घेतला होता. वेस्ट बंगाल येथील खुल्या स्पर्धामध्ये वाघोली (पुणे) येथील ११ मुलांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये कालिदास जायेभाये, संतोष सूर्यवंशी, भूषण भांडलकर, वंश मंडरे, शिव स्वामी, जयेश पवार, विनायक ईघवे, अनुष्का खेडेकर, सेजल येवले यांनी प्रथम तर लक्ष्मण वाल्हेकर, मंगेश डिसले याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. प्रशिक्षक संजय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कराटे स्पर्धेत बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रशिक्षकांचे माजी उपसरपंच समीर (आबा) भाडळे, उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी अभिनंदन केले आहे.