मॅनहटन – अमेरिकेतील अब्जाधीश उद्योगपती थऑमस ली यांनी आपल्या कार्यालयात आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे आढळून आले. सकाळपासून ली यांच्या केबिनमधून कोणतीच विचारणा न आल्यामुळे त्यांच्या सहायक महिलेने त्यांच्याकडे काही विचारणा करण्यासाठी केबिनचा दरवाजा उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
प्रायव्हेट इक्वीटी बिजनेसमध्ये थॉमस ली हे सर्वात पहिले मानले जात असत. त्यांच्या उद्योग क्षेत्रातील यशामुळे त्यांच्या यशस्वितेबद्दलचे आदर्श नवउद्योजकांना सांगितले जात असत. ली हे समाससेवेच्या कार्यामध्येही सतत सक्रिय असायचे ज्यू इतिहास, ब्रॅन्ड युनिव्हर्सिटी, म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट आणि हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्येही त्यांनी मोठ्या देणग्या दिल्या होत्या. गुंतवणूक क्षेत्रात 1974 मध्ये ली यांनी थॉमस ली ऍन्ड पार्टनरशीप नावाची कंपनी सुरू केली होती. त्यांनी 2006 मध्ये ली इक्विटी नावाची कंपनीदेखील सुरू केली होती.