मुंबई – मनसेचे नेते अमित ठाकरे यांची गाडी समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर थांबवून ठेवल्याने मनसैनिकांनी रविवारी मध्यरात्री टोलनाक्याची तोडफोड करत प्रचंड नुकसान केले होते. या प्रकारावरून भाजपने अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “टोल फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायला शिका आणि शिकवा,” असा टोला भाजपाने अमित ठाकरेंवर लगावला. यानंतर आता मनसेकडून देखील या टोलेबाजीला उत्तर देण्यात आलं आहे. यामुळे मनसे आणि भाजपमध्ये सोशल मीडिया वॉर सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपने आपल्या सोशल मीडियावर अमित ठाकरे आणि टोलनाका याबाबत एक व्हिडीओ शेअर करून टीका केली होती. मनसेने देखील आपल्या सोशल मीडियावरून या टीकेला उत्तर दिले. ज्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
“जर सत्ताधीश पक्ष फोडण्यात मश्गुल नसते तर इर्शाळवाडीची दुर्घटना टळली असती आणि त्या निष्पाप जीवांचे प्राण वाचले असते.” अमित ठाकरेंचे हे पोस्टर शेअर करत मनसेने एक पोस्ट केली आहे. “मनविसे अध्यक्ष अमित ठाकरेंचं हेच विधान इतकं झोंबलंय कि पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय.आणि हो, कायदा-सुव्यवस्थेची इतकी काळजी असेल तर महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढतंय ? मुलींवर दिवसाढवळ्या कोयत्याने का वार होत आहेत ? बस अपघातांमध्ये आपली माणसं दगावतात आणि एकीकडे त्यांचा अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून मंत्र्यांचे शपथविधी कसे घेतले जातात? माणसं किड्या-मुंग्यांसारखी मरत आहेत आणि त्याचं सोयरंसुतक नसणारे निरंकुश सत्ताधीश पक्ष फोडण्यात मश्गुल आहेत.” अशी पोस्ट मनसेच्या अधिकृत अकाऊंटवरून करण्यात आली आहे.
मनविसे अध्यक्ष श्री. अमित ठाकरेंचं हेच विधान इतकं झोंबलंय कि पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय.
आणि हो, कायदा-सुव्यवस्थेची इतकी काळजी असेल तर महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढतंय ? मुलींवर दिवसाढवळ्या कोयत्याने का वार होत आहेत ?… pic.twitter.com/LrAr4inpUR
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 25, 2023
अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा.असं म्हणत भाजपने ट्विट केला होता व्हिडीओ.
अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा.#Tollnaka #BJPMaharashtra #BJPGovt pic.twitter.com/BBRfDT9rlP
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 24, 2023