मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार अचानक राजभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेत नेतेही उपस्थित आहेत. अजित पवार महाराष्ट्राच्या सत्तेत सामील होणार असून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभावनात दाखल झाले आहे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप आणि शिंदे गटाचे नेतेही राजभवनाच्या दिशेने निघाले आहेत. याशिवाय, भाजप आणि राष्ट्रवादीचे काही नेते आधीपासूनच राजभवनात दाखल झाले आहेत. आज अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे इतर काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. 6 जुलैला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे, या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे, अशातच आत अजित पवार सत्तेत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.