मुंबई – दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच त्याने या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेता रणवीरसिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे तुफान व्हायरल होत आहे.
वास्तविक, हे आलिया आणि रणवीरचे फोटो ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या फर्स्ट लूक टेस्टचे आहे. यात आलिया आणि रणवीरचा लुक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. आलियाने या फोटोमध्ये फिकट हिरव्या रंगाची साडी घातली आहे. तर रणवीरने देखील हिरव्या रंगाचे शर्ट परिधान केले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये आलियाने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. सध्या त्यांचा हा लुक अनेकांच्या पसंतीस पडत आहे. या फोटोमध्ये त्यांनी एकापेक्षा एक रोमॅंटिक पोझ दिल्या आहेत.
करणने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांचा आणि सेलिब्रिटींचा सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरने या फोटोला ‘फॅब’ अशी प्रतिक्रिया दिली. अनेक चाहते आलिया आणि रणवीरला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.
दरम्यान, हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. कॉमेडी आणि रोमान्सचा तडकाही या चित्रपटात दिसून येतो. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामधील ‘तुम क्या मिले’ हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीर यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.