मुंबई – टीव्ही अभिनेता जय भानुशाली आणि माही विज सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा ते त्यांची लेक तारासोबतचे रिल्स सोशल मीडियावर शेअर करत असतात. ताराचे खोडकर व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत असतात. मात्र अवघ्या 4 वर्षांची असलेली तारा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच तारा भानुशाली चक्क न्यूयॉर्क टाइम्सच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर झळकली आहे. ताराचा जन्म 3 ऑगस्ट 2019 रोजी झाला होता. त्यामुळे तिचा यंदाचा हा वाढदिवस खूप खास ठरला आहे. या मोठ्या व्यासपीठावर आपल्या लाडक्या मुलीचा चेहरा पाहून जय आणि माहीसह सर्व चाहत्यांनाही आनंद झाला आहे.
जय भानुशालीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवरील ताराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जय आणि माहीची लेक मस्ती करताना दिसत असून यात ती खुपच गोड दिसत आहे. माहीने देखील ताराबाबत पोस्ट शेअर करत अभिमानाने स्वत:ला आई म्हंटले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, यापूर्वी साऊथ स्टार अभिनेता महेश बाबू यांची मुलगी सीताराची पहिली जाहिरात टाइम्स स्क्वेअरमध्ये प्रदर्शित झाली होती. सिताराचे वडील महेश बाबू आणि आई नम्रता शिरोडकर आपल्या मुलीला ही ओळख मिळाल्याने खूप आनंदी झाले होते.