बागी-4 ची जोरदार तयारी सुरू झाली असून पुढील वर्षी या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात येणार आहे. हा चित्रपट 2022मध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाच्या कथेवर लेखकांची टीम कार्यरत आहेत. यावेळी निर्माता साजिद नाडियाडवाला हे दमदार कथानक मांडणार आहेत. “बागी’ सिरीजमध्ये प्रत्येक वेळी दमदार ऍक्शन पाहावण्यास मिळाल्या, परंतु “बागी-3’च्या कथेत दम नव्हता.
या चित्रपटाचा नायक निश्चित झाला असून पुन्हा एकदा टायगर आहे. त्याची ही शैली चाहत्यांना नेहमीच आवडली आहे आणि टायगरच्या चाहत्यांना डोळ्यासमोर श्रॉफ जबरदस्त स्टंट करताना दिसणार आहे. तो पुन्हा एकदा सैन्याबरोबर एकट्याने लढताना झळकणार आहे.
या चित्रपटातील नायिकेबाबत सांगायचे झाल्यास “बागी’च्या टीमच्या मते, याचे स्क्रिप्ट अंतिम झाल्यानंतरच नायिकेची घोषणा केली जाईल. परंतु यासाठी आतापासूनच काही नावांचा विचार केला जात आहे. “बागी’ आणि “बागी-3’मध्ये श्रद्धा कपूर, तर “बागी-2’मध्ये दिशा पटनी झळकली होती.
आता “बागी-4’साठी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही दावेदार मानली जात आहे. साजिदच्या बॅनरअंतर्गत अनेक चित्रपटात जॅकलीनने काम केले असून तिचे नाव निश्चित मानले जात आहे. तसेच “फ्लाइंग जट्ट’मध्येही तिने टायगर श्रॉफसोबत काम केलेले आहे.