नांदेड – नांदेडमध्ये महिला उत्थान मंडळाच्या वतीने आसाराम बापूंच्या समर्थनार्थ महिला निाचे औचित्य साधून ( 8 मार्च) मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. आसाराम बापू यांची सुटका करावी अशी मागणी या महिलांनी केली.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू सध्या तुरुंगात आहेत. मात्र त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, असा दावा करेत बापूंची लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणसाठी नांदेडमध्ये काही महिलांनी आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
या महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. तसेच आसाराम बापू निर्दोष असून एका मुलीच्या सांगण्यावरून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाही. वयाकडे बघता आसाराम बापू यांना त्वरित मुक्त करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलीय.
यावेळी मोर्चादरम्यान आसाराम बापूंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या हातामध्ये वेगवेगळे फलक होते. बापू यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. ज्या मुलीने आरोप केलेले आहेत तिच्या वयासंदर्भातही ठोस पुरावा नाही. वैद्यकीय तपासणीचा अहवालदेखील नॉर्मल आहे. आमचे बापू निर्दोष आहेत. एक मुलगी आरोप करतेय म्हणून बापूंना दोषी ठरवले जातेय, अशी प्रतिक्रिया आंदोलक महिलेने दिली. तसेच आसाराम बापूंची लवकरात लवकर सुटका करावी, अशी मागणी या महिलेने केली.