‘तेरे नाम’मधील ती वेडसर मुलगी आता दिसते ‘अशी’ 

मुंबई – सलमान खानच्या बरोबर “तेरे नाम’ या हिट सिनेमातून प्रसिद्ध झाला होता.  या चित्रपटात राधे नावाचा कॉलेजमधला एक टपोरी युवक आणि साधी सरळ निर्जला यांची ही लव्हस्टोरी तुफान गाजली होती. या चित्रपटातील सलमानची हेअर स्टाईलही ‘राधे कट’ नावाने ओळखली जाऊ लागली होती. तर भूमिका चावला आणि  इतर कलाकार आजही आठवत असेल.

दरम्यान, या चित्रपटातील वेडसर महिलेचा चेहरा तुम्हाला आठवत असेल. वेड्यांच्या इस्पितळात जाणाऱ्या सलमानला रोखण्यासाठी त्याच्या मागे धावत सुटणारी ती वेडसर महिला आणि तो सीन पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले होते. डोळ्यांत पाणी आणणा-या त्या दृश्यातील ती वेडसर महिला दुसरी कुणी नसून एक मोठी नायिका आहे.

 

 

 

‘तेरे नाम’मध्ये भलेही ती वेडसर, मळलेल्या कपड्यात दिसली असेल. मात्र रिअल लाईफमध्ये ती कमालीची सुंदर आहे. तिचे नाव राधिका चौधरी असून विद्यापीठात मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर डिग्री मिळविली आहे. १९९९ मध्ये एका तेलगू चित्रपटाद्वारे राधिकाने आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर बॉलिवूडमध्येही ती दिसली. राधिकाने पुणे तिने विभिन्न भाषांमध्ये ३०पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. 2010 मध्ये लास वेगास फिल्म फेस्टिवलमध्ये तिच्या ‘आॅरेंज ब्लॉसम’ या शॉर्ट फिल्मने सिल्व्हर ऐस अवार्ड जिंकला होता. सध्या तिने आपल्या बॉलीवूड करिअरला ब्रेक दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.