कर्नाटकात रविवारी रात्री उशिरा बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवमोगा जिल्ह्यात काल एका 26 वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर तणाव वाढला आहे. ही घटना रात्री 9 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार,हर्षा असे हत्या करण्यात आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे.
Karnataka | A 26-year-old Bajrang Dal activist Harsha was allegedly murdered yesterday at around 9 pm in Shivamogga. Security heightened in the city.
— ANI (@ANI) February 20, 2022
या घटनेचा हिजाब वादाशीही संबंध जोडला जात आहे. तपासादरम्यान असे आढळून आले की हर्षाने नुकतीच त्याच्या फेसबुक हिजाबच्या विरोधात आणि भगव्या शालीच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली होती. त्यामधून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या घटनेच्या तपासास सुरुवात केली आहे.
I'm very disturbed by the murder of a Bajrang Dal activist. He was killed by 'Musalmaan goondas' (Muslim goons). I'm going to Shivamogga now to analyse the situation. We'll not allow 'goondaism': Karnataka Minister KS Eshwarappa pic.twitter.com/PRYxakUzJO
— ANI (@ANI) February 21, 2022
या घटनेबाबत कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले, ‘4-5 तरुणांच्या टोळक्याने 26 वर्षीय तरुणाची हत्या केली. या हत्येमागे कोणती संघटना आहे हे मला माहीत नाही. सध्या शिवमोगा येथे कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत.