-->

‘अॅमेझॉन’ला पावणे चार लाखांचा गंडा

पिंपरी – अॅमेझॉन कंपनीच्या गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने गोडाऊनमधून तीन लाख 76 हजार 157 रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना ऑक्‍टोबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत टेल्को रोड, पिंपरी येथील सोर्टेशन सेंटर येथे घडली.

सोमेश्‍वर दत्ता खरात (वय 22, रा. ओटास्कीम, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय एकनाथ पवार (वय 29, रा. नवी मुंबई) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टेल्को रोड पिंपरी येथे एमआयडीसीचे सेंट्रल वेअर हाऊस आहे. त्यात अॅमेझॉन कंपनीचे गोडाऊन आहे. आरोपी सोमेश्‍वर त्या गोडाऊनमध्ये काम करत होता.

त्याने ऑक्‍टोबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत गोडाऊनमधून तीन लाख 76 हजार 157 रुपये किमतीचे लॅपटॉप, कॉम्प्युटर, इतर साहित्य चोरून नेले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.