पुणे – एम. टेनिस अकादमी आयोजित अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत राघव सरोदे, सर्वज्ञ सरोदे, युगंधर शास्त्री यांनी तर, मुलींच्या गटात वैष्णवी नागोजी, शिबानी गुप्ते यांनी मुख्य फेरीत प्रवेश केला.
पात्रता फेरीत मुलांच्या गटात राघव सरोदे याने रुद्र पटवर्धनचा 6-0, 6-0 असा तर, सर्वज्ञ सरोदेने रिषभ गोचडेचा 6-2, 6-0 असा सहज पराभव केला. चुरशीच्या लढतीत युगंधर शास्त्रीने वेदांत जोशीचा 5-7, 6-2, 7-5 असा तीन सेटमध्ये पराभव करून मुख्य फेरी गाठली. मुलींच्या गटात वैष्णवी नागोजी हिने अन्वी पाटणकरवर 6-1, 6-2 असा विजय मिळवला. ओजसी देगमवारने तविशा नागरचे आव्हान 6-1, 6-0 असे संपुष्टात आणले.