पाटण – कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमानामुळे आज दुपारी दोनपासून दहा हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज दि. 12 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता धरणाची पाणी पातळी 2161 फूट 11 इंच झाली असून धरणामध्ये 103.19 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक अपेक्षित आहे.
धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजता धरणाची वक्रद्वारे 1 फूट उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 10000 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. तसेच, धरणामधील आवक वाढल्यास या विसर्गामध्ये वाढ होणार असल्याने कोयना नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.