वारंगल – पेपर फुटीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले तेलंगणा भाजपचे अध्यक्ष बंदी संजय यांना न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, तुरूंगातून सुटल्यानंतर बंदी यांनी भव्य रोड शो केला आहे. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
दरम्यान, बंदी यांना न्यायालयाने परवानगीशिवाय भारत न सोडण्याची अट न्यायालयाने घातली आहे. बुधवारी एसएससी पेपर लीक प्रकरणी बंदी संजयसह अन्य तिघांना 19 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, त्यांच्या सुटकेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे सरकारी पक्षातर्फे सांगण्यात आले.
#WATCH | Telangana BJP president Bandi Sanjay holds rally in Karimnagar after being released on bail in the SSC paper leak case pic.twitter.com/gWpCABuK0x
— ANI (@ANI) April 7, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाला भेट दिल्यानंतर लगेचच बंदी संजय कुमार यांना बुधवारी मध्यरात्रीनंतर त्यांच्या करीमनगर येथील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी संजय यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बंदी संजय यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम 420 व अन्य अनुषंगिक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.