मुंबई – साऊथ सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांचा आदिपुरुष हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगही जोरदार होती.
View this post on Instagram
या चित्रपटात रामायणाची कथा आहे. अशात अनेक पात्रे यात दाखवण्यात आली आहेत. रामायणातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे शूर्पणखा, तिचे नाक लक्ष्मणाने कापले होते. हे पात्र आदिपुरुष चित्रपटातही दाखविण्यात आले आहे. मराठामोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने चित्रपटात शूर्पणखाची भूमिका साकारली आहे. सध्या तेजस्विनीच्या अभिनयाची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मुख्य कलाकारांव्यतिरिक्त, इतर सर्व कलाकारांबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, रिलीजनंतर या चित्रपटात कोणी कुठली भूमिका साकारली आहे यांची माहिती घेण्यात येत आहे. मात्र तेजस्विनीने याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट लिहत माहिती दिली आहे. जे आयुष्यात कधी केलं नाही, ते चित्रपटात करून घेतलं…. म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये Watch me in Adipurush as “शूर्पणखा” असं लिहीत सोबत फोटो शेअर करत माहिती दिली आहे.
आदिपुरुषमध्ये शूर्पणखा बनलेली तेजस्विनी पंडित मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तेजस्विनी तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. तिला मुक्तपणे जगायला आवडते. तेजस्विनी इंस्टाग्रामवर सक्रिय असून ती एकदम बिंदास आपलं मत मांडताना दिसते.
तेजस्विनीने 2004 मध्ये अगं बाई अरेच्चा या मराठी चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. याशिवाय तेजस्विनी अनेक वेब सीरिजचा भागही आहे. ‘रानबाजार’आधीअनेक वेब सीरिज, मालिका आणि चित्रपटांमधून तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला.