मुंबई – अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तेजस्वी सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक फोटो ती इनस्टाग्रामवर शेअर करत असते. मात्र अनेकदा तिला तिच्या कपड्यावरून ट्रोल केलं जातं. यावेळी आता तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे.
त्याचं झाले असे की, नुकत्याच झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये तेजस्वी प्रकाश देखील दिसली होती. नेहमीप्रमाणेच तिने हटके लुक केला होता. यावेळी तिने पँट-सूटसह पांढरा फुलांचा गजरा आणि चोकर सेट घातला होता. यात ती ग्लॅमरस दिसत होती. काहींना तिचा हा लुक आवडला होता. तर काहींनी तिच्यावर टीका केली.
यावर एका मुलाखतीत तिने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. ती म्हणाली, “माझ्या पोशाखाबद्दल जो कोणी माझा तिरस्कार करतो, तो त्यांचा एक चॉइस आहे. कारण ही स्टाइल मी निवडली आहे.” याआधी देखील अनेकदा तेजस्वीला ट्रोल करण्यात आले आहे.
तेजस्वी प्रकाशने आपल्या करिअरची सुरुवात ‘संस्कार – धरोहर अपना की’ मधून केली होती. यानंतर त्याने ‘स्वरागिनी’, ‘पेहरेदार पिया की’, ‘रिश्ता लिखेंगे हम नया’, ‘कर्ण संगिनी’, ‘खतरों के खिलाडी 10’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ‘बिग बॉस 15’ चा विजेता झाल्यानंतर त्याचे नशीब पलटले. त्यानंतर तिला ‘नागिन 6’ या मालिकेची ऑफर आली.
View this post on Instagram
आज ती टीव्हीच्या सर्वात महागड्या आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. लवकरच तेजस्वीच्या ड्रीम गर्ल 2 या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी शूटिंग जूनमध्ये सुरू होणार होते, परंतु पावसाळ्यामुळे पुढे शेड्यूल करण्यात आले.