आॅकलंड : मायदेशात नुकत्याच आटोपलेल्या आॅस्ट्रेलिया विरूध्दच्या वन-डे मालिकेत २-१ ने विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ मंगळवारी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. भारतीय संघ पुढील ६ आठवडे न्यूझीलंडमध्ये असणार आहे.
Touchdown Auckland. Let’s go 🇮🇳 @imShard @ShreyasIyer15 pic.twitter.com/8Lo2c1usmM
— Virat Kohli (@imVkohli) January 21, 2020
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या ट्विटर अकाउंटवर न्यूझीलंडमध्ये पोहचलो असल्याचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याच्यासोबत रविंद्र जडेजा, लोकेश राहुल आणि मनीष पांडे हे देखील दिसत आहेत. ते सर्व एका हाॅटेलमध्ये जेवणाचा अस्वाद घेताना दिसत आहेत.
Top team gym session and a good meal out in beautiful Auckland 👌👌 @im_manishpandey @imjadeja @klrahul11 pic.twitter.com/nAuA1ro58h
— Virat Kohli (@imVkohli) January 22, 2020
या दौ-यात भारत-न्यूझीलंड दरम्यान पाच टी-२० (२४ जानेवारीपासून), तीन वन-डे (५ फेब्रुवारीपासून) आणि दोन कसोटी (२१ फेब्रुवारीपासून) सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.