अमृता सिंहसोबतच्या घटस्फोटाबद्दल सैफ म्हणाला…

बॉलिवूडमधील चार्मिंग अभिनेता सैफ अली खानचा जवानी जानेमन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. या चित्रपटातून पूजा बेदीची कन्या आलिया फर्नीचरवाला पदार्पण करणार आहे. यामध्ये सैफसोबत तब्बूही झळकणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सैफ अली खान व्यस्त असून एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने अमृता सिंहसोबत घटस्फोटावरही अनेक घटना सांगितल्या.

सैफ अली खान म्हणाला कि, घटस्फोट ही जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे. त्यावेळी काही वेगळे आणि चांगले होऊ शकले असते. मला वाटत नाही कि मी कधीही या घटनेतून सावरू शकेल. कारण काही अशाही गोष्टी असतात ज्याच्यावर आपण नियंत्रण ठेऊ शकत नाही. त्यावेळी मी केवळ २० वर्षाचा होतो.

सारा आणि इब्राहिमबद्दल सैफ म्हणाला, कोणत्याही मुलास त्याच्या कुटूंबापासून वेगळे केले जाऊ नये. याचा परिणाम मुलांवर होतो. कधीकधी परिस्थिती वेगळी असते. तरीही त्याला व्यवस्थित हाताळायला हवी. पालक एकत्र नसतात किंवा बर्‍याच तक्रारी असतात. पण त्यादरम्यान एक स्थिर घरातील वातावरण मुलांसाठी खूप महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

Happiest birthday Abba 🎁 🎂 🍰 I love you so much ❤️🤗👨‍👧‍👦🐣🐥

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची १९९१ पहिली भेट बेखुदी चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतर काही महिन्यातच सैफ आणि अमृता विवाहबंधनात अडकले. मात्र २००४ साली त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर १६ ऑक्टोबर २०१२ साली सैफने करिना कपूरही लग्नगाठ बांधली.

दरम्यान, सैफ अली खानचा नुकताच तान्हाजी : द अनसंग वॉरियर चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकला आहे. यानंतर जवानी जानेमन, दिल बेचारा आणि बंटी और बबली या चित्रपटांमध्ये सैफ दिसणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here