नवी दिल्ली – इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात टाटा मोटर्स आगामी काळात चांगले काम करणार असल्यामुळे टाटा मोटर्सच्या शेअरच्या भावात या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
बुधवारी या कंपनीचा शेअर 20 टक्क्यांनी वाढला. टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात बरेच काम केले आहे. आगामी काळात या उद्योगाचे विस्तारीकरण करण्यासाठी टाटा मोटर्स गुंतवणूक आकर्षित करीत आहे.
त्यामुळे या कंपनीचे भविष्य चांगले असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनाला आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे धोरण जाहीर केले आहे. यासाठी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अनुदानही दिले जात आहे.