स्वच्छ भारत अभियान समिती |भाजपच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी गणेश कुटेंची निवड

वाघोली (प्रतिनिधी) :  स्वच्छ भारत अभियान समिती भाजपच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी गणेश कुटे यांची नुकतीच निवड झाली असून त्यांना निवडीचे पत्र राज्याचे अध्यक्ष धनंजय दगडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, खासदार यशवंत सिंग दरबार, राजेश झा,  राजेश राय, डी. पी. बजाज, आदी मान्यवर उपस्थित होते.

भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियान या उपक्रमाअंतर्गत भाजपच्या वतीने स्वच्छ भारत अभियान समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती देशभरात कार्यरत आहे. देशभर स्वच्छतेचे महत्व  नागरिकांना पटवून  देण्यासाठी समिती कार्यरत आहे.

वैयक्तिक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता याबाबतचे महत्त्व नागरिकांना पटवून देऊन त्यांच्यामध्ये स्वच्छतेचे महत्व वृद्धिंगत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही समिती  कार्य करत आहे.

या समितीच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी भाजप नेते गणेश बापू कुटे यांची निवड झाल्याने सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.